भजनी मालिका
← भजनांकडे परत

दुरवरी वोझें वाहिलासे भार । आतां वेरझार खुंटलीसे

duravari vojhen vahilase bhar | atan verajhar khuntalise

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
दुरवरी वोझें वाहिलासे भार । आतां वेरझार खुंटलीसे ॥१॥ माझिया पैं मनें मानिला विश्वास । दृढभावें आस धरियेली ॥२॥ सांपडला मार्ग उत्तमाउत्तम । गेलें कर्म धर्म पारुषोनी ॥३॥ एका जनार्दनीं पाहतां निश्चित । निवारली भ्रांति देहा देव ॥४॥