भजनी मालिका
← भजनांकडे परत

दुजी येऊनी पुढें बोले ऐकें वो बाई । घुसळण घुसळितां डेरां फोडिला पाहीं

duji yeuni pudhen bole aiken vo bai | ghusalan ghusalitan deran phodila pahin

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
दुजी येऊनी पुढें बोले ऐकें वो बाई । घुसळण घुसळितां डेरां फोडिला पाहीं ॥१॥ धांवुनि आलीं सासु मारितसें मजला । हांसतसे आपण तेथोनि पळाला ॥२॥ वांसुरें तीं साडीं मुला चिमुरे घेतो । द्या रे नवनीत म्हणोनि तया मारितो ॥३॥ लपविलें ठायीं उरों नेदी कांहीं । एका जनार्दनीं पुरें आतां बाई ॥४॥