भजनी मालिका
← भजनांकडे परत

दुबार बाहुली वस्तुरूप झाली । पाहतां सोहं मेळी चिदांनंद

dubar bahuli vasturup jhali | pahatan sohan meli chidannand

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
दुबार बाहुली वस्तुरूप झाली । पाहतां सोहं मेळी चिदांनंद ॥१॥ अधमात्रा स्थान नयनींच प्रमाण । मसुरेसमान हा वर्ण जेथें ॥२॥ सुषुम्ना कुंडलिनी कासीया सांगातिनी । निश्चिती तें नयनीं बिंदुरूप ॥३॥ एका जनार्दनी पाहे डोळियां भीतरीं । सबाह्म अभ्यंतरीं तरीच दिसे ॥४॥