भजनी मालिका
← भजनांकडे परत

दुःखाचिया भोगी कोडी । रसना गोडी बाधक

duhkhachiya bhogi kodi | rasana godi badhak

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
दुःखाचिया भोगी कोडी । रसना गोडी बाधक ॥१॥ पाहतां रस उत्तम दिसत । भीतरीं रोगाचें गळ गुप्त ॥२॥ गळीं अडकला जो मासा । तो जीत ना मरे चरफडी जैसा ॥३॥ जन्ममरण लागले खांदीं । एका जनार्दनीं धरा शुद्धी ॥४॥