भजनी मालिका
संत एकनाथ

संत एकनाथ

सोळाव्या शतकातील पैठणचे संत; एकनाथी भागवत व भारुडांचे कर्ते.

संत एकनाथांनी एकनाथी भागवत, भावार्थ रामायण आणि लोकशिक्षण देणारी अनेक भारुडे रचली. त्यांनी ज्ञानेश्वरीची शुद्ध प्रत तयार केली.

या संतांची भजने

अंकित अंकिला भक्तांचा कैवारी । वेद निरंतरी वाखाणिता ॥१॥ तें रुप गोजिरें सांवळें साजिरें । उभे तें भीवरे पैलथडीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

अंकिला देव संतद्वारीं । भिक्षा मागें तो निर्धारीं ॥१॥ मज द्याहो प्रेमभिक्षा । देव बोले तया प्रत्यक्षा ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

अगम्य तुझा खेळ न कळे अकळ । ब्रह्मादिक वेडे जाले तेथें आम्हां कैचें बळ ॥१॥ कान्होबा भला भला तुं होसी । चोरी करुनि दिसों न देसी रे कान्होबा ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

अगाध चरणाचें महिमान वानितां वेदां पडिलें मौन्य ॥१॥ पुराणें वर्णितां भागलीं सहाशास्त्रें वेडावलीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

अगाध जीवनीं मत्स्य ते असती । नाहीं दुःखप्राप्ति तयां कधीं ॥१॥ परि आलिया ढीवर घालितसे गळ । मग तळतळ करुनी काय ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

अगाध तुझीं लीला आकळ कैसेनी कळे । ब्रह्मा मुंगी धरूनी तुझें स्वरुप सांवळें ॥१॥ तुज कैसे भजावें आपणां काय देखावें । तुजपाशीं राहुनी तुजला कैसें सेवावें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

अगाध भगवंतांची नामें । अगाध त्यांची जन्मकर्में ॥१॥ शिणले ते वाखाणितां । शेषा न कळें तत्त्वतां ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

अंगासी राख ढूंगासी लंगोटी । गोसावे हातवटी मिरविती ॥१॥ अल्लख म्हणोनि भिक्षा मागताती । अलखाची गती न कळे मूढां ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

अंगीं जया पुर्ण शांती । वाचा रामनाम वदती । अनुसरले चित्तवृत्तीं । संतचरणीं सर्वदा ॥१॥ घडो तयांचा मज संग । जन्ममरणाचा फिटतसे पांग । आधिव्याधि निरसोनी सांग । घडतां संग वैष्णवांचा ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ