भजनी मालिका
← भजनांकडे परत

अंकित अंकिला भक्तांचा कैवारी । वेद निरंतरी वाखाणिता

ankit ankila bhaktancha kaivari | ved nirantari vakhanita

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
अंकित अंकिला भक्तांचा कैवारी । वेद निरंतरी वाखाणिता ॥१॥ तें रुप गोजिरें सांवळें साजिरें । उभे तें भीवरे पैलथडीं ॥२॥ योगीयांचे ध्यान पारुषलें मन । ते समचरण विटेवरी ॥३॥ एका जनार्दनी चहूं अठरा वेगळा । न कळे ज्यांची लीला सनकादिकां ॥४।।