भजनी मालिका
← भजनांकडे परत

अंगासी राख ढूंगासी लंगोटी । गोसावे हातवटी मिरविती

angasi rakh dhungasi langoti | gosave hatavati miraviti

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
अंगासी राख ढूंगासी लंगोटी । गोसावे हातवटी मिरविती ॥१॥ अल्लख म्हणोनि भिक्षा मागताती । अलखाची गती न कळे मूढां ॥२॥ भांगेचा सुकाळ चेले करी मूढ । यम तया दृढ दंड करी ॥३॥ अलक्ष अलक्ष आलख कळेना । जगीं विटंबना उगीच करिती ॥४॥ एका जनार्दनीं नको ऐसें सोंग । तेणें पांडुरंग अंतरेल ॥५॥