भजनी मालिका
← भजनांकडे परत

अखंड सदा ध्यान । पाडुरंगी लावा मन

akhand sada dhyan | padurangi lava man

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
अखंड सदा ध्यान । पाडुरंगी लावा मन ॥१॥ ऐसा उदार हा हिरा । टाकूनी वेचिताती गारा ॥२॥ अमृत सांडोनी । बळें घेती कांजवंणी ॥३॥ कामधेनु कल्पतरु । एका जनार्दनीं आगरु ॥४॥