भजनी मालिका
← भजनांकडे परत

अंगीं जया पुर्ण शांती । वाचा रामनाम वदती । अनुसरले चित्तवृत्तीं । संतचरणीं सर्वदा

angin jaya purna shanti | vacha ramanam vadati | anusarale chittavruttin | santacharanin sarvada

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
अंगीं जया पुर्ण शांती । वाचा रामनाम वदती । अनुसरले चित्तवृत्तीं । संतचरणीं सर्वदा ॥१॥ घडो तयांचा मज संग । जन्ममरणाचा फिटतसे पांग । आधिव्याधि निरसोनी सांग । घडतां संग वैष्णवांचा ॥२॥ जें दुर्लभ तिहीं लोकां । आम्हां सांपडलें फुका । एका जनार्दनीं घोका । नाम त्यांचे आवडी ॥३॥ हे पण वाचा: संत एकनाथांची संपूर्ण माहिती