भजनी मालिका
संत एकनाथ

संत एकनाथ

सोळाव्या शतकातील पैठणचे संत; एकनाथी भागवत व भारुडांचे कर्ते.

संत एकनाथांनी एकनाथी भागवत, भावार्थ रामायण आणि लोकशिक्षण देणारी अनेक भारुडे रचली. त्यांनी ज्ञानेश्वरीची शुद्ध प्रत तयार केली.

या संतांची भजने

अनन्य आवरी उदक निर्मळ । वासना सोज्वळ नम्रपणें ॥१॥ प्रक्षाळिले पाय वाही एक माथा । हृदयीं प्रीति धरितां प्रेमलाभ ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

अनन्य शरण विठोबासी निघाले । ते जीवन्मुक्त जाले याचि देहीं ॥१॥ देहीं याचि देवो विटेवरी पाहे । सबाह्म उभा आहे कर कटीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

अनाथाचा नाथ दीनाचा दयाळ । म्हणवोनि सांभाळ करीं माझा ॥१॥ तुज ऐसा देव नाहीं त्रिभुवनीं । म्हणोवोनि चरणीं विनटलों ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

अनाथाचा नाथ पतित पावन । ब्रीद सत्य जाण करितसे ॥१॥ अनंत भक्तांचें अनंते धांवणे । वाढविलें तेणें नामासाठीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

अनाथाचा नाथ पतीतपावन । हें नामभिदान तया साजे ॥१॥ भाळी अर्धचंद्र जटाजुट गंगा । दरुशनें पापें जातीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

अनादि सांवळा देखियेला डोळां । मनु माझा वेधिला सांगु काय ॥१॥ जीवाविरहित जालें देह हारपलें । शिवपणें गुंतलें गुरुकृपें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

अनुतापावांचुनी नाम न ये मुखा । वाउगाचि देखा शीण होय ॥१॥ मुख्य तो संकल्प अनुताप वाहे । मग चित्त होय शुद्ध तेणें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

अनुतापें करीं नामस्मरण वाचे । तंव मोहिनी येउनी साचे कर धरी ॥१॥ आडवी मोहिनी उगवतां दिन । सत्वाचें हरण करुं पाहे ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

अनुपम्य क्षेत्र अनुपम्य देव । नसे तोचि ठाव पंढरीये ॥१॥ अनुपम्य वाहे पुढें चंद्रभागा । अनुपम्य भंगा दोष जाती ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

अनुपम्य ज्ञान अनुपम्य मतें । अनुपम्य सरतें पंढरीयें ॥१॥ अनुपम्य वेद अनुपम्य शास्त्र । अनुपम्य पवित्र पंढरीये ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

अनुपम्य नारीनर ते दैवाचे । अनुपम्य त्यांचे पुण्य देखा ॥१॥ अनुपम्य वास जयांसी पंढरी । प्रत्यक्ष वैकुंठपुरी अनुपम्य ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

अनुपम्य पुराणं सांगर्ती सर्वथा । अनुपम्य तत्त्वतां पंढरीये ॥१॥ अनुपम्य योग अनुपम्य याग । अनुपम्य अनुराग पंढरीये ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

अनुपम्य वाचे वदतां पंढरी । होतसे बोहरे महात्पापा ॥१॥ अनुपम्य ज्याचा विठ्ठली जो भाव । अनुपम्य देव तिष्ठे घरीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

अनुपम्य वास पंढरीस ज्याचा । धन्य तो दैवाचा अनुपम्य ॥१॥ अनुपम्य घडे चंद्रभागे स्नान । अनुपम्य दान नाम वाचे ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ