भजनी मालिका
← भजनांकडे परत

अनुपम्य नारीनर ते दैवाचे । अनुपम्य त्यांचे पुण्य देखा

anupamya narinar te daivache | anupamya tyanche punya dekha

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
अनुपम्य नारीनर ते दैवाचे । अनुपम्य त्यांचे पुण्य देखा ॥१॥ अनुपम्य वास जयांसी पंढरी । प्रत्यक्ष वैकुंठपुरी अनुपम्य ॥२॥ अनुपम्य पहाती विठलरायातें । दरुशनें पावती मुक्तीने अनुपम्य ॥३॥ अनुपम्य भक्त नंदिती दैवाचे । अनुपम्य त्यांचे सुख देखा ॥४॥ अनुपम्य एका जनार्दनीं चरणीं । अनुपम्य विनवणी करितसे ॥५॥