भजनी मालिका
← भजनांकडे परत

अनाथाचा नाथ पतीतपावन । हें नामभिदान तया साजे

anathacha nath patitapavan | hen namabhidan taya saje

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
अनाथाचा नाथ पतीतपावन । हें नामभिदान तया साजे ॥१॥ भाळी अर्धचंद्र जटाजुट गंगा । दरुशनें पापें जातीं ॥२॥ एका जनार्दनीं नाम जपा होटीं । पातकें नाशाकोटी हेळामात्रें ॥३॥