भजनी मालिका
← भजनांकडे परत

अनुतापें करीं नामस्मरण वाचे । तंव मोहिनी येउनी साचे कर धरी

anutapen karin namasmaran vache | tanv mohini yeuni sache kar dhari

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
अनुतापें करीं नामस्मरण वाचे । तंव मोहिनी येउनी साचे कर धरी ॥१॥ आडवी मोहिनी उगवतां दिन । सत्वाचें हरण करुं पाहे ॥२॥ मज दिली भाक उगवली आजी । प्रतिज्ञा हे माझी खरी जाली ॥३॥ देई मज आशा सोडी कां उदक । सुकृत सम्यक व्रताचें तें ॥४॥ चिंतावला राजा मागें म्हणॆ पाटलासी । इच्छिलें पदार्थांसी देईन मी ॥५॥ येरी म्हणे तुझा कुळींचा दीपक । तो देई सम्यक मजलागीं ॥६॥ नाहीं चाड मज पदार्थी अनेकां । कापोनियां दे कां मस्तकासी ॥७॥ एक जनार्दनीं राजिया संकट । न सुचे आणीक कांही तया ॥८॥