भजनी मालिका
← भजनांकडे परत

अनन्य शरण विठोबासी निघाले । ते जीवन्मुक्त जाले याचि देहीं

ananya sharan vithobasi nighale | te jivanmukta jale yachi dehin

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
अनन्य शरण विठोबासी निघाले । ते जीवन्मुक्त जाले याचि देहीं ॥१॥ देहीं याचि देवो विटेवरी पाहे । सबाह्म उभा आहे कर कटीं ॥२॥ कर कटीं उभा लावण्याचा गाभा । श्रीमुखाची शोभा काय वानुं ॥३॥ कोटी रवीतेज वोवाळवे चरणीं । एका जनार्दनीं धन्य तोची ॥४॥