भजनी मालिका
संत एकनाथ

संत एकनाथ

सोळाव्या शतकातील पैठणचे संत; एकनाथी भागवत व भारुडांचे कर्ते.

संत एकनाथांनी एकनाथी भागवत, भावार्थ रामायण आणि लोकशिक्षण देणारी अनेक भारुडे रचली. त्यांनी ज्ञानेश्वरीची शुद्ध प्रत तयार केली.

या संतांची भजने

हृदयस्थ असोनी कां रे फिरसी वायां । दीप आणि छाया जयापरी ॥१॥ आत्मतीर्थी सुस्नात झालिया मन । आणिक साधन दुजें नाहीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

हृदयस्थ जया नाहीं ठावा देव । पूजा करती वाव सर्वभावें ॥१॥ जाणावा अंतरीं मानावा हृदयीं । पहावा सर्वांतरीं परमात्मा ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

हृदयीं नांदें संदेह मूळ । तेथें फळ विरुढें केंवी ॥१॥ जैसें बीज तैसा अंकुर । दिसे निर्धार जाणावा ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

हृदयीं परमात्मा नांदे परिपुर्ण । तो शिव सनातन पूर्णब्रह्मा ॥१॥ जीव तो गुंतला विषयाचे लक्षीं । शिव सर्वसाक्षीं परब्रह्मा ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

हृदयींच स्नान हृदयींच ध्यान । हृदयींच भजन सर्वकाळ ॥१॥ हृदयींच दान हृदयींच धर्म । ह्रुदयींच नेम सर्व जोडे ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

हृदयींचे देव हृदयींच भक्त । हृदयींच होत पूजा सर्व ॥१॥ ह्रुदयींच ध्यान हृदयीं जें मन । हृदयीं तें आसन देव वसे ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

हें तों अवघें फजितीचें भांड । अंतकाळीं तोंड काळें करती ॥१॥ चालता इंदियें म्हणती माझें माझें । अंतकाळीचें वोझें न घेती हे ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

हें शरीर नाशिवंत साचें । जायाचें हो जायाचें अंतकाळीं ॥१॥ काय याचें सुख मानिती हे जन । पडिलेसें जाण मायाचक्री ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

हें सहजवि थोरावले । पृथ्वी आप तेज झालें । वायु आकाश संचलें । आनंदले सकलही ॥१॥ तें माहेरी येवढें चक्र । गगनीं हा निर्धार । याचा पाहे पां विचार । चैतन्यामाजीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

हेमवंताच्या पोटीं एक जन्मली गोरटी । तये त्या धूर्जटी वरियलें ॥१॥ मंडपाच्या द्वारीं आला जंव नोवरा । अवगुणाचा म्हातारा रुप नाहीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

होई शरणागत भाकी रे करुणा । तरीच बंधना चुकशील ॥१॥ आपुलें तूं हित करूनियां घेई । सदा वाचे गाई रामनाम ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

होईन मी दास कामारी संताचा । संकल्प हा साचा जीवभावें ॥१॥ घालीन लोटांगण करीन पुजन । भावें वोवाळीन प्राण माझा ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ