भजनी मालिका
← भजनांकडे परत

हेंचि वेदोक्ति निजसार । आत्मा अविनाश साचार

henchi vedokti nijasar | atma avinash sachar

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
हेंचि वेदोक्ति निजसार । आत्मा अविनाश साचार ॥१॥ नाहीं जन्ममरणाचा धाक । बोले शुद्ध बुद्ध ऐसा वेद ॥२॥ श्रुतिशास्त्र तेही वदती । आत्मा अविनाश म्हणती ॥३॥ एका जनार्दनीं नाहीं मरण । मग कैंचे देहींचें स्फुरण ॥४॥