भजनी मालिका
← भजनांकडे परत

हें सहजवि थोरावले । पृथ्वी आप तेज झालें । वायु आकाश संचलें । आनंदले सकलही

hen sahajavi thoravale | pruthvi ap tej jhalen | vayu akash sanchalen | anandale sakalahi

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
हें सहजवि थोरावले । पृथ्वी आप तेज झालें । वायु आकाश संचलें । आनंदले सकलही ॥१॥ तें माहेरी येवढें चक्र । गगनीं हा निर्धार । याचा पाहे पां विचार । चैतन्यामाजीं ॥२॥ तेथें वेदासी बोबडी । अनुभवी पैलथडी । एका जनार्दनीं गोडी । नित्य घेतसे ॥३॥