भजनी मालिका
← भजनांकडे परत

हेचि देवासी विनंती । संतसेवा दिवसरातीं

hechi devasi vinanti | santaseva divasaratin

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
हेचि देवासी विनंती । संतसेवा दिवसरातीं ॥१॥ वास देई पंढरीचा । नामघोष कीर्तनाचा ॥२॥ सदा सर्वदा नाम मुखीं । दुर्जें नको कांही पारखीं ॥३॥ एका जनार्दनीं हरीचा दास । म्हणतां पुरें सर्व आस ॥४॥