भजनी मालिका
संत एकनाथ

संत एकनाथ

सोळाव्या शतकातील पैठणचे संत; एकनाथी भागवत व भारुडांचे कर्ते.

संत एकनाथांनी एकनाथी भागवत, भावार्थ रामायण आणि लोकशिक्षण देणारी अनेक भारुडे रचली. त्यांनी ज्ञानेश्वरीची शुद्ध प्रत तयार केली.

या संतांची भजने

सुटला म्हणतां बांधला होता । मुक्त म्हणे त्याचें अंगीं ये बद्धता ॥१॥ बद्धता येथें नाहीं मुक्त ते काई । भ्रांती दो ठाई झोंबतसे ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

सुंदर तें ध्यान मांडिवर घेउनी । कौसल्या जननी गीतीं गाये ॥१॥ सुंदर तें ध्यान नंदाच्या अंगणीं । गोपाळ गौळनी खेळताती ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

सुंदर बाळका म्हणती गोपिका यशोदा रोहिणी सन्मुखा । आदि नाटका नाच व्यापका मिळालिया अनेका । सर्व पाळका सकळ चाळका सुखदाता सकळिका । धिमी धिमी बाळा नाचे वहिला म्हणती मायादिका ॥१॥

रचनाकार: संत एकनाथ

सुंदर मुख साजिरें कस्तुरी मळवटीं । मुरली वाजवीत उभा यमुनेचे तटीं । गोपवेष शोभे खांदा कांबळी हातीं काठी । तो नंदनंदन देखीला जगजेठी वो ॥१॥

रचनाकार: संत एकनाथ

सुंदरु बाळपणाची बुंथी घेऊनी श्रीपती । सनकादिकां गाती तेथें कुंठित गे माय ॥१॥ ब्रह्मा वेडावलें ते वेंडावलें । पुंडलिकाधीन झालें गे माय ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

सुदर्शन घेऊनि हातीं । पावला तो लक्ष्मीपती ।देखतांची श्रीपती । तन्मय बाळ जाला ॥१॥ बाळकें धरिले चरण । देवें दिधलें आलिंगन । करें कुर्वाळुनी वदन । चुंबनाते दिधले ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

सुर्य आहे डोळा नाहीं । तेथें पाहणें न चले कांहीं ॥१॥ सुर्य आणि दृष्टी दोन्हीं आहे । परि दृश्य पाहणें नाहीं होय ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

सुलभ सोपारें नाम मुखीं गातां । पातकांच्या चळथा कांपताती ॥१॥ हरिनाम सार वाचे तो उच्चार । तरलें नारीनर नाममात्रें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

सुवर्च्यानामें स्वर्गीची देवांगना । ब्रह्मशापें जाण घारी जाली ॥१॥ अयोध्येचा राजा दशरथ नृपती । यज्ञ पुत्राप्रती करिवला ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

सूर्य अंधारांतें नासी । परी तो सन्मुख नये त्यासी ॥१॥ माझें जिणें देखणेपण । तेंचि मायेचें लक्षण ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

सूर्यवंशामाजीं उत्तानपाद राय । सत्यधर्मी होय पराक्रमी ॥१॥ भूतांचा मत्सर नाहीं तेथें द्वेष । चारी धर्म निर्दोष चालताती ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

सेवेंचे कारण मुख्य तो सदभाव । इतर ते वाव इंद्रिय बाधा ॥१॥ साधन हेंचि साधी तोडी तूं उपाधी । नका ऋद्धिसिद्धि आणिक कांही ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

सैराटगोधनें चालती वनां । तयामागें चाले वैकुंठीचा राणा ॥१॥ सांवळे चतुर्भुज मेघःश्याम वर्ण । गाईगोपाळां समवेदा खेळे मनमोहन ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

सोईरे धाईरे आम्हीं संतजन । तयाविण चिंतन आन नाहीं ॥१॥ हाचि माझा बहव हीच माझी भक्ति । आणिक विश्रांती दुजी नाहीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ