भजनी मालिका
← भजनांकडे परत

सुंदर तें ध्यान मांडिवर घेउनी । कौसल्या जननी गीतीं गाये

sundar ten dhyan mandivar gheuni | kausalya janani gitin gaye

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
सुंदर तें ध्यान मांडिवर घेउनी । कौसल्या जननी गीतीं गाये ॥१॥ सुंदर तें ध्यान नंदाच्या अंगणीं । गोपाळ गौळनी खेळताती ॥२॥ सुंदर ते ध्यान चंद्रभागे तटीं । पुंडलिकापाठीं उभे असे ॥३॥ सुंदर ते ध्यान एका जनार्दनीं । जनीं वनीं मनीं भरलासे ॥४॥