भजनी मालिका
← भजनांकडे परत

सुलभ सोपारें नाम मुखीं गातां । पातकांच्या चळथा कांपताती

sulabh soparen nam mukhin gatan | patakanchya chalatha kampatati

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
सुलभ सोपारें नाम मुखीं गातां । पातकांच्या चळथा कांपताती ॥१॥ हरिनाम सार वाचे तो उच्चार । तरलें नारीनर नाममात्रें ॥२॥ वेदांत सिद्धांत तयांचा संकेत । नामें होती मुक्त महापापी ॥३॥ एका जनार्दनीं वेदांचें निजसार । नाम परात्पर जपती सर्व ॥४॥