भजनी मालिका
← भजनांकडे परत

सुर्य आहे डोळा नाहीं । तेथें पाहणें न चले कांहीं

surya ahe dola nahin | tethen pahanen na chale kanhin

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
सुर्य आहे डोळा नाहीं । तेथें पाहणें न चले कांहीं ॥१॥ सुर्य आणि दृष्टी दोन्हीं आहे । परि दृश्य पाहणें नाहीं होय ॥२॥ सुर्य प्रकाशी रूपासी । एका जनार्दनीं स्वरुपासी ॥३॥