भजनी मालिका
← भजनांकडे परत

होईन मी दास कामारी संताचा । संकल्प हा साचा जीवभावें

hoin mi das kamari santacha | sankalpa ha sacha jivabhaven

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
होईन मी दास कामारी संताचा । संकल्प हा साचा जीवभावें ॥१॥ घालीन लोटांगण करीन पुजन । भावें वोवाळीन प्राण माझा ॥२॥ आणिक सायास न करीं कांहीं आस । होईल निजदास संतचरणीं ॥३॥ एका जनार्दनीं हेंचि वाटे बरें । आणिक दुसरें नको कांहीं ॥४॥