भजनी मालिका
← भजनांकडे परत

अनुपम्य उपासना । अनुपम्य चरणी संताचिये

anupamya upasana | anupamya charani santachiye

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
अनुपम्य उपासना । अनुपम्य चरणी संताचिये ॥१॥ अनुपम्य भक्ति गोड । अनुपम्य लिगाड तुटत ॥२॥ अनुपम्य पंढरीचा वास । अनुपम्य दैवास दैव त्यांचे ॥३॥ अनुपम्य नाचती वैष्णव । अनुपम्य गौरव तयांचे ॥४॥ अनुपम्य एका जनार्दनीं । अनुपम्य चरणीं संताचिये ॥५॥