भजनी मालिका
← भजनांकडे परत

अगाध जीवनीं मत्स्य ते असती । नाहीं दुःखप्राप्ति तयां कधीं

agadh jivanin matsya te asati | nahin duhkhaprapti tayan kadhin

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
अगाध जीवनीं मत्स्य ते असती । नाहीं दुःखप्राप्ति तयां कधीं ॥१॥ परि आलिया ढीवर घालितसे गळ । मग तळतळ करुनी काय ॥२॥ आमीष देखोनी भक्षावया जाय । परिनेणे काळ आहे म्हणोनियां ॥३॥ एका जनार्दनीं प्राणी तेक भुलले । आमिषा गुंतले मीनापरी ॥४॥