भजनी मालिका
← भजनांकडे परत

अखंड वाचे नाम । तया न बाधी क्रोध काम

akhand vache nam | taya na badhi krodh kam

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
अखंड वाचे नाम । तया न बाधी क्रोध काम ॥१॥ रामनाम वदता वाचे । ब्रह्मासुख तेथें नाचें ॥२॥ राम नाम वाचे टाळी । महादोषां होय होळीं ॥३॥ दो अक्षरासाठीं । ब्रह्मा लागे पाठोपाठीं ॥४॥ एका जनार्दनीं नाम । सहज चैतन्य निष्काम ॥५॥