भजनी मालिका
← भजनांकडे परत

अगाध चरणाचें महिमान । वेदशास्त्रां पडिलें मौन

agadh charanachen mahiman | vedashastran padilen maun

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
अगाध चरणाचें महिमान । वेदशास्त्रां पडिलें मौन ॥१॥ चरणें तारिलें पाषाण । चरणें तारिलें भक्तजन ॥२॥ तारियेलें प्रल्हादासी । उद्धारिले अजामेळासी ॥३॥ एका जनार्दनीं शरण । चरण तिहीं लोकीं पावन ॥४॥