भजनी मालिका
← भजनांकडे परत

दुर्जनाचें संगें दुर्जन लागत । नाना विटंबीत सज्जनासी

durjanachen sangen durjan lagat | nana vitambit sajjanasi

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
दुर्जनाचें संगें दुर्जन लागत । नाना विटंबीत सज्जनासी ॥१॥ दुर्जनाचें अन्न सेउनी दुर्वास । छळिलें पांडवांस निशीमाजीं ॥२॥ एका जनार्दनीं दुर्जनाचा संग । तेणें होय भंग भाविकांचा ॥३॥