भजनी मालिका
← भजनांकडे परत

दीपाचिया अंगसंगा । कोण सुख आहे पतंगा

dipachiya angasanga | kon sukh ahe patanga

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
दीपाचिया अंगसंगा । कोण सुख आहे पतंगा ॥१॥ दीपा रूपाचेनि कोडें । पतंग स्नेहांत उडी पडे ॥२॥ एका निमाले देखतो । दुजा उडी घाली अवचितीं ॥३॥ ऐशी भुललीं बापुडीं । एका जनार्दनीं धरूनि गोडी ॥४॥