भजनी मालिका
संत एकनाथ

संत एकनाथ

सोळाव्या शतकातील पैठणचे संत; एकनाथी भागवत व भारुडांचे कर्ते.

संत एकनाथांनी एकनाथी भागवत, भावार्थ रामायण आणि लोकशिक्षण देणारी अनेक भारुडे रचली. त्यांनी ज्ञानेश्वरीची शुद्ध प्रत तयार केली.

या संतांची भजने

नरनारी जातां पंढरीसी । सुकृतांची रासी ब्रह्मा नेणें ॥१॥ अभाव भावना न धरी कल्पना मस्तक चरणावरी ठेवी ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

नलगे भुक्तिमुक्ति नलगे स्वर्गवास । नको वैकुंठावास देवराया ॥१॥ नलगे योगयाग अष्टांग साधन । न चुकें बंधन येणें कांहीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

नव लक्ष गोपाळ यमुनेतटीं । उभे राहुनी दृष्टी पाहताती ॥१॥ खल्लाळाचा शब्द कानीं तो ऐकिला । पेंदा पुढें झाला सरसाउनी ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

नवजों योगाचिया वाटा । न चढों आगम निगम ताठा । न लागों उपामाळा खटपटा । आत्मनिष्ठ होउनी असों ॥१॥ विठ्ठल उघड विराजित । साबाह्माभ्यंतर नांदत ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

नवमास वरी वाहिलें उदरीं । तिसी दारोदारीं हिंडावितो ॥१॥ लालन पालन करीत आवडी । जोडली ती जोडी नेदी तिसी ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

नवल ती कळा दावी गोपिकांसी । लोणी चोरायासी जातो घरा ॥१॥ धाकुले संवगडे ठेवुनि बाहेरी । प्रवेशी भीतरीं आपणची ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

नवल दंभाचें कौतुक । अग्नहोत्री म्हणती याज्ञिक ॥१॥ मंत्रतंत्राची कथा कोण । मुख्य गायत्री विकिती ब्राह्मण ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

नवल देखिलें संसाराचेंक बंड । त्याचे कोणी तोंड न ठेचिती ॥१॥ गुंतलेचि बळें चिखलें माखलें । कर्मा जन्मफळें भोगिताती ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

नवविधा भक्ति नव आचरती । त्याची नामकीर्ति सांगुं आतां ॥१॥ एक एक नाम घेतां प्रातःकाळीं । पापा होय होळी क्षणमात्रें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

नसे वैकुंठी हरी । नाचे कीर्तनीं परोपरी । भक्तांबरोबरी । पाठी धांवे तयाच्या ॥१॥ म्हणोनी करावें कीर्तन । तेणें तुष्टें नारायण । मनोरथ करी पुर्ण । इच्छिलें ते सर्वदा ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

नाकळे जो आकळ । भक्तिप्रेमाचा वत्सल । रूप धरूनि कोमळ । भीमातटीं उभा ॥१॥ त्याचा छंद असो जनी । काया वाचा आणि मनीं । संचिताची हानी । कदा काळीं न होवो ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

नाकळें तें कळें कळे तें नाकळे । वळे तें नावळे गुरुविण ॥१॥ निर्गुणीं पावलें सगुणीं भजतां । विकल्प धरितां जिव्हा झडे ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

नागर गोमटें रुप तें गोजिरें । उभे तें साजिरें भीमातटीं ॥१॥ पहातां विश्रांति देहा होय शांती । अनुपम्य मूर्ति विठ्ठल देव ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

नाचेन आनंदें विठ्ठलनाम छंदें । परते भेदाभेद सांडोनियां ॥१॥ जाईन पंढरीं नाचेन महाद्वारी । वाचे हरि हरि रामकृष्ण ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

नाठवेचि दुजें कानड्यावांचुनी । कानडा तो मनींध्यानी वसे ॥१॥ कानडा कानडा विठ्ठल कानडा । कानडा विठ्ठल कानडा ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ