भजनी मालिका
← भजनांकडे परत

नाकळें तें कळें कळे तें नाकळे । वळे तें नावळे गुरुविण

nakalen ten kalen kale ten nakale | vale ten navale guruvin

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
नाकळें तें कळें कळे तें नाकळे । वळे तें नावळे गुरुविण ॥१॥ निर्गुणीं पावलें सगुणीं भजतां । विकल्प धरितां जिव्हा झडे ॥२॥ बहुरुपी धरी संन्याशाचा वेश । पाहोन तयास धन देती ॥३॥ संन्याशाल नाहीं बहुरुपीं याला । सगुणीं भजला तेथें पावे ॥४॥ अद्वैताचा खेळ दिसे गुणागुणीं । एका जनार्दनीं ओळखिलें ॥५॥