भजनी मालिका
← भजनांकडे परत

नाकळे जो आकळ । भक्तिप्रेमाचा वत्सल । रूप धरूनि कोमळ । भीमातटीं उभा

nakale jo akal | bhaktipremacha vatsal | rup dharuni komal | bhimatatin ubha

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
नाकळे जो आकळ । भक्तिप्रेमाचा वत्सल । रूप धरूनि कोमळ । भीमातटीं उभा ॥१॥ त्याचा छंद असो जनी । काया वाचा आणि मनीं । संचिताची हानी । कदा काळीं न होवो ॥२॥ जें जें होत कर्माकर्म । अथवा उत्तम ते धर्म । प्राचीन ते कर्म । तयापासूनि सोडवी ॥३॥ एकविधि धरी भाव । मागें देवापदीं ठाव । संचिताची हाव । तयापाशीं नुरेचि ॥४॥ ऐसा बळकट करी नेम । धरी संतसमागम । एका जनार्दनीं धाम । पावसी तूं वैकुंठ ॥५॥