भजनी मालिका
← भजनांकडे परत

नसे वैकुंठीं अणुमात्र । नाचतां पवित्र कीर्तनीं

nase vaikunthin anumatra | nachatan pavitra kirtanin

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
नसे वैकुंठीं अणुमात्र । नाचतां पवित्र कीर्तनीं ॥१॥ त्याचा छंद माझे मनीं । अनुदिनीं कीर्तन ॥२॥ नेणें कांहीं दुजें आतां । कीर्तनापरता छंद नाहीं ॥३॥ एका जनार्दनीं वेध । कीर्तन छंद गोड देखा ॥४॥