भजनी मालिका
संत एकनाथ

संत एकनाथ

सोळाव्या शतकातील पैठणचे संत; एकनाथी भागवत व भारुडांचे कर्ते.

संत एकनाथांनी एकनाथी भागवत, भावार्थ रामायण आणि लोकशिक्षण देणारी अनेक भारुडे रचली. त्यांनी ज्ञानेश्वरीची शुद्ध प्रत तयार केली.

या संतांची भजने

नाम निवृत्ति धन्य तो निवृत्ति । देह निवृत्ति पाहतां डोळां ॥१॥ संसार सारासार निवृत्ति । वेद निवृत्ति नाम गातां ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

नाम पवित्र आणि परिकर । नामें तरले दोषी अपार । नामें हेंचि निजसार । आधार वेदशास्त्रांचे ॥१॥ तारक कलिमाजीं नाम । भोळ्याभाविकां सुगम । ज्ञाते पंडित सकाम । नामें तरती श्रीहरींच्या ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

नाम पावन पावन । नाम दोषांसि दहन । नाम पतीतपावन । कलीमाजीं उद्धार ॥१॥ गातां नित्य हरिकथा । पावन होय श्रोता वक्ता । नाम गाऊनि टाळी वाहतां । नित्य मुक्त प्राणी तो ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

नाम मुखीं गातां विषयांची वार्ता । नोहेचि सर्वथा गातीयासी ॥१॥ नाम तें पावन नाम तें पावन । नामवांचूनि जाण श्रेष्ठ कोण ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

नाम मुखी सदां धन्य तो संसारीं । वायां हाव भरी होऊं नये ॥१॥ तारक तें नाम तारक तें नाम । तारक तें नाम विठोबाचे ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

नाम श्रीकृष्ण उद्धवें साधिलें । चोविस नामें झालें जप पवे ॥१॥ आठवा श्रीकृष्ण आठवा श्रीकृष्ण । आठवा श्रीकृष्ण वेळोवेळां ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

नाम श्रेष्ठ तिहीं लोकीं । म्हणोनि शिव नित्य घोकी ॥१॥ सदा समाधी शयनीं । राम चिंती ध्यानीं मनीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

नाम सुलभ सोपें गातां । नाहीं भय आणि चिंता । पळती दोषांच्या चळथा । नाम गातां देशोधडीं ॥१॥ म्हणोनि धरियेली कास । जाहलों संतांचा मी दास । नाम गातां उल्हास । वारंवार मानसीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

नाम हरिहर संसार तो हरी । सबाह्म अभ्यंतरीं हरि माझा ॥१॥ हरिनाम जपें हरिनाम जपें । ते वर्म सोपें हरि जपें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

नाम हे नौका तारक भवडोहीं । म्हणोनि लवलाही वेग करा ॥१॥ बुडतां सागरीं तारुं श्रीहरी । म्हणोनि झडकरी लाहो करा ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

नाम हें पावन नाम हें पावन । दुजा ठाव आन नाहीं येथें ॥१॥ देखेणाही झाला देखणाही झाला । देखणाही झाला अंधत्वेसी ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

नामचेनि पाठें जाती पैं वैकुंठी । आणिक खटपटी न तरती ॥१॥ आठवा नामपाठ आठवा नामपाठ । वाउगा बोभाट करुं नका ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ