भजनी मालिका
← भजनांकडे परत

नाम निजभावेंसमर्थ । जेथें नाम तेथें दत्त

nam nijabhavensamartha | jethen nam tethen datta

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
नाम निजभावेंसमर्थ । जेथें नाम तेथें दत्त ॥१॥ वाचे म्हणता देवदत्त । दत्त करी गुणातीत ॥२॥ दत्तनामाचा सोहळा । धाक पडे कळिकाळां ॥३॥ दत्तनामाचा निजछंद । नामीं प्रगटे परमानंद ॥४॥ एका जनार्दनीं दत्त । सबाह्म स्वानंदें भरीत ॥५॥