भजनी मालिका
← भजनांकडे परत

नाम पावन श्रीरामांचे । घेतां वाचे शुभची

nam pavan shriramanche | ghetan vache shubhachi

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
नाम पावन श्रीरामांचे । घेतां वाचे शुभची ॥१॥ नाहीं तेथें गोवांगुतीं । नामेंची चढ ती वैकुंठीं ॥२॥ भ्रमलियासी उद्धार । नाम सोपें जपतां सार ॥३॥ दोचि अक्षरांचे काम । वाचे म्हणा रामनाम ॥४॥ नाम आवडीनें घोका । म्हणे जनार्दनीं एका ॥५॥