भजनी मालिका
← भजनांकडे परत

नामधारक हो कां भलता । त्याचे चरणीं ठेवीन माथा

namadharak ho kan bhalata | tyache charanin thevin matha

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
नामधारक हो कां भलता । त्याचे चरणीं ठेवीन माथा ॥१॥ न म्हणे उत्तम अधम । मुखीं जपतां रामनाम ॥२॥ यातीकुळाचें कारण । नाहीं नामविण ॥३॥ नाम जपे तोचि श्रेष्ठ । एका जनार्दनीं वरिष्ठ ॥४॥