भजनी मालिका
← भजनांकडे परत

नाम हे नौका तारक भवडोहीं । म्हणोनि लवलाही वेग करा

nam he nauka tarak bhavadohin | mhanoni lavalahi veg kara

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
नाम हे नौका तारक भवडोहीं । म्हणोनि लवलाही वेग करा ॥१॥ बुडतां सागरीं तारुं श्रीहरी । म्हणोनि झडकरी लाहो करा ॥२॥ काळाचा तो फांसा पडला नाही देहीं । म्हणोनी लवलाही लाहो करा ॥३॥ एका जनार्दनीं लाहो कर बळें । सर्वदा सर्वकाळें लाहो करा ॥४॥