भजनी मालिका
संत एकनाथ

संत एकनाथ

सोळाव्या शतकातील पैठणचे संत; एकनाथी भागवत व भारुडांचे कर्ते.

संत एकनाथांनी एकनाथी भागवत, भावार्थ रामायण आणि लोकशिक्षण देणारी अनेक भारुडे रचली. त्यांनी ज्ञानेश्वरीची शुद्ध प्रत तयार केली.

या संतांची भजने

नामपाठ अंडज जारज स्वेदज । उद्भिज देख चार योनी ॥१॥ नामपाठ प्रेमें गाय तूं आवडीं । तुटेल सांकडीं कर्म धर्म ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

नामपाठ करा नामपाठ करा । चवर्‍याशींचा फेरा चुकवा जगीं ॥१॥ नामपाठ गाये नामपाठ गाये । पुनरपी नये संसारासी ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

नामपाठ करितां आनंद मानसें । योगयाग राशीं पायां लागे ॥१॥ आनंदें आवडी नामपाठ गाय । उभा तारिता बाह्मा जना ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

नामपाठ करितां काळ वेळ नाहीं । उच्चारुनी पाहीं सर्वकाळ ॥१॥ सर्वभावें नामपाठ तूं गाये । आणिक न करी काय साधन तें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

नामपाठ करितां जाईल पैं चिंता । मोक्ष सायुज्यता हातां येई ॥१॥ म्हणोनि सोपें वर्म सांगतसे तुज । नामपाठ गुज जपें सदा ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

नामपाठ कसवटी अखंड ज्याचे मुखीं । तोचि झाला इहीं जनीं ॥१॥ नामपाठ धन्य नामपाठ धन्य । नामपाठ धन्य कालीमाजीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

नामपाठ कालीमाजीं सोपें वर्म । साधन तो श्रम न करीं वायां ॥१॥ नामपाठ गाये नामपाठ गाये । वायां तूं न जाय खटपटा ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

नामपाठ किती सर्वात वरिष्ठ । नको साधन कष्ट आणिक कांहीं ॥१॥ नामपाठमाला हृदयीं ध्याई भावें । उगेंचि जपावें मौन्यरुप ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

नामपाठ केशव वदा नित्य वाचे । सार्थक देहांचे सहजासहज ॥१॥ आठवी केशव आठवीं केशव । ठेवी तूं भाव केशवचरणीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

नामपाठ गंगा नामपाठ सरिता । सागर जाती भंगा नामपाठें ॥१॥ नामपाठ सरिता सागर संगम । देवभक्त नाम तिन्हीं बोध ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

नामपाठ गाय सदा नामपाठ गाय । धन्य त्याची माय त्रिभुवनीं ॥१॥ ब्रह्मादिक वंदिती शिवादिक ध्याती । नामपाठ कीर्ति मुखीं गातां ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

नामपाठ गाये धन्य तो संसारीं । काय त्याची थोरी वानूं जगीं ॥१॥ तयाचे चरणीं माझा दंडवत । नामपाठ गात सर्वभावें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

नामपाठ गाये संतांचे संगती । नाही पुनरावृत्ति तया मग ॥१॥ नामपाठ गाय सर्व भावें मनीं । चुकेल आयणी गर्भवास ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

नामपाठ गाये सदोदित मनीं । यमाची जाचणी नोहे तया ॥१॥ नामपाठ भावें आदरें जो गाये । सर्व सुख पाहे तया होय ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

नामपाठ गीता नामपाठ गीता । नाम पाठ गीता गाय सदा ॥१॥ हाचि बोध सोपा अर्जुना उपदेश । नामपाठें क्लेश सर्व गेले ।२॥

रचनाकार: संत एकनाथ

नामपाठ गोविंद हाचि लागो छंद । न करी भेदाभेद हृदयामाजीं ॥१॥ गोविंद नाम गाय गोविंद नाम गाय । गोविंद नाम गाय हृदयीं सदा ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

नामपाठ जपे भोळा महादेव । देवाधि देव वंदी तया ॥१॥ विष तें अमृत नामपाठें झाले । दैन्य दुःख गेलें नाम जपतां ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

नामपाठ जया नाही पैं सर्वथा । तयासी तत्त्वतां यमदंड ॥१॥ मारिती तोडिती यमाचे ते दूत । नामपाठीं चित्त कां रें नेणें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

नामपाठ जागीं सोपें तें साधन । म्हणोनि वर्णन वैष्णव करिती ॥१॥ आनंदे नाचती टाळी वाजविती । नामपाठ गाती सर्वभावें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ