भजनी मालिका
← भजनांकडे परत

नामपाठ गाये संतांचे संगती । नाही पुनरावृत्ति तया मग

namapath gaye santanche sangati | nahi punaravrutti taya mag

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
नामपाठ गाये संतांचे संगती । नाही पुनरावृत्ति तया मग ॥१॥ नामपाठ गाय सर्व भावें मनीं । चुकेल आयणी गर्भवास ॥२॥ जनार्दनीचा एका नामपाठ गायें । जनार्दनीं पाहे जनीं वनीं ॥३॥