भजनी मालिका
← भजनांकडे परत

नामपाठ केशव वदा नित्य वाचे । सार्थक देहांचे सहजासहज

namapath keshav vada nitya vache | sarthak dehanche sahajasahaj

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
नामपाठ केशव वदा नित्य वाचे । सार्थक देहांचे सहजासहज ॥१॥ आठवी केशव आठवीं केशव । ठेवी तूं भाव केशवचरणीं ॥२॥ जनार्दनाचा एका केशवीं विनटला । प्रेमें तो दाटला हृदयामाजीं ॥३॥