भजनी मालिका
← भजनांकडे परत

नामपाठ गाय सदा नामपाठ गाय । धन्य त्याची माय त्रिभुवनीं

namapath gay sada namapath gay | dhanya tyachi may tribhuvanin

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
नामपाठ गाय सदा नामपाठ गाय । धन्य त्याची माय त्रिभुवनीं ॥१॥ ब्रह्मादिक वंदिती शिवादिक ध्याती । नामपाठ कीर्ति मुखीं गातां ॥२॥ एका जनार्दनीं साराचें हें सार । नामपाठ निर्धार केला जगीं ॥३॥