भजनी मालिका
← भजनांकडे परत

नामपाठ जपे भोळा महादेव । देवाधि देव वंदी तया

namapath jape bhola mahadev | devadhi dev vandi taya

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
नामपाठ जपे भोळा महादेव । देवाधि देव वंदी तया ॥१॥ विष तें अमृत नामपाठें झाले । दैन्य दुःख गेलें नाम जपतां ॥२॥ जनार्दनाचा एका उभारुनि बाह्या । नामपाठ गाय सर्वकाळ ॥३॥