भजनी मालिका
← भजनांकडे परत

नाम मंगळा मंगळ । झालें जन्माचें सफळ

nam mangala mangal | jhalen janmachen saphal

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
नाम मंगळा मंगळ । झालें जन्माचें सफळ ॥१॥ दत्त जीवींचे जीवन । दत्त कारणा कारण ॥२॥ अनुसूयात्मजा पाही । देहभाव उरला नाहीं ॥३॥ एका जनार्दनीं दर्शन । चित्त झालें समाधान ॥४॥