भजनी मालिका
← भजनांकडे परत

नाम हरिहर संसार तो हरी । सबाह्म अभ्यंतरीं हरि माझा

nam harihar sansar to hari | sabahma abhyantarin hari majha

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
नाम हरिहर संसार तो हरी । सबाह्म अभ्यंतरीं हरि माझा ॥१॥ हरिनाम जपें हरिनाम जपें । ते वर्म सोपें हरि जपें ॥२॥ जनार्दनाचा एका हरिचरणीं देखा । सुखासुख सुखा अनुभवला ॥३॥