भजनी मालिका
← भजनांकडे परत

नवल भजनाचा भावो । स्वतां भक्तांची होय देवो

naval bhajanacha bhavo | svatan bhaktanchi hoy devo

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
नवल भजनाचा भावो । स्वतां भक्तांची होय देवो ॥१॥ वाचे करिती हरिकीर्तन । उन्मनी मन निशिदिनीं ॥२॥ नाहीं प्रपंचाचें भान । वाचे सदा नारायण ॥३॥ एका जनार्दनीं मुक्त । सबाह्म अभ्यंतरीं पतीत ॥४॥