भजनी मालिका
← भजनांकडे परत

नवल देखिलें संसाराचेंक बंड । त्याचे कोणी तोंड न ठेचिती

naval dekhilen sansarachenk band | tyache koni tond na thechiti

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
नवल देखिलें संसाराचेंक बंड । त्याचे कोणी तोंड न ठेचिती ॥१॥ गुंतलेचि बळें चिखलें माखलें । कर्मा जन्मफळें भोगिताती ॥२॥ नाथिला पसारा मानिती वो साचा । वेध तो तयाचा वागविती ॥३॥ एका जनार्दनीं नाडलेसे मोहें । संदेह संदेह गोवियलें ॥४॥