भजनी मालिका
← भजनांकडे परत

नसे वैकुंठी हरी । नाचे कीर्तनीं परोपरी । भक्तांबरोबरी । पाठी धांवे तयाच्या

nase vaikunthi hari | nache kirtanin paropari | bhaktambarobari | pathi dhanve tayachya

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
नसे वैकुंठी हरी । नाचे कीर्तनीं परोपरी । भक्तांबरोबरी । पाठी धांवे तयाच्या ॥१॥ म्हणोनी करावें कीर्तन । तेणें तुष्टें नारायण । मनोरथ करी पुर्ण । इच्छिलें ते सर्वदा ॥२॥ आणा अनुभव मनीं । करा कीर्तन अनुदिनीं । एका जनार्दनीं । उभा असे कीर्तनीं ॥३॥