भजनी मालिका
← भजनांकडे परत

नव लक्ष गोपाळ यमुनेतटीं । उभे राहुनी दृष्टी पाहताती

nav laksha gopal yamunetatin | ubhe rahuni drushti pahatati

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
नव लक्ष गोपाळ यमुनेतटीं । उभे राहुनी दृष्टी पाहताती ॥१॥ खल्लाळाचा शब्द कानीं तो ऐकिला । पेंदा पुढें झाला सरसाउनी ॥२॥ पेंदा म्हणे गडिया आपणा पाहुनी यमुना । हुंबरी घेती जाणा पहा पहा ॥३॥ एका जनार्दनीं पाहुनिया देव । करितां उपाव नवलाचा ॥४॥