भजनी मालिका
← भजनांकडे परत

नाचेन आनंदें विठ्ठलनाम छंदें । परते भेदाभेद सांडोनियां

nachen ananden viththalanam chhanden | parate bhedabhed sandoniyan

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
नाचेन आनंदें विठ्ठलनाम छंदें । परते भेदाभेद सांडोनियां ॥१॥ जाईन पंढरीं नाचेन महाद्वारी । वाचे हरि हरि रामकृष्ण ॥२॥ साधन आणीक नेणें मी सर्वथा । एका पंढरीनाथावांचुनी कांहीं ॥३॥ एका जनार्दनीं दृढ हा निश्चय । मुखीं नाम गाय सदोदित ॥४॥